Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Cancelled For Disability Employee ] : निवडणूक कामकाजामधून खाली नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना वगळणेबाबत मुख्य निवडणुक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर पत्रानुसार दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या कामकाजातुन वगळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत कि , मा.भारत निवडणूक आयोगाने दि.07 जून 2023 रोजच्या पत्रानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणारा कर्मचारी वृदांबाबत ..
निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . लोकसभा निवडणूका 2024 च्या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 07 जुन 2023 रोजीच्या मार्गदर्शक सूचना नुसार दिव्यांगांच्या नियुक्तीबाबत खालील नमुद पत्रानुसार महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरच्या पत्रानुसार दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांना निवडणूक कामकाजा करीता नियुक्त करताना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 07 जुन 2023 रोजीच्या पत्रातील मागदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झालेला सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.