Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State District Wise havaman Andaj ] : राज्यात दिनांक 21 एप्रिल ते दिनांक 28 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये , कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल तर कोणत्या जिल्ह्यात तापमान अधिक राहील याबाबत महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे . हवामान अंदाज तज्ञ पंजाबरावांनी सदर कालावधीमधील अंदाज व्यक्त केला आहे , जर जाणून घेवूयात सविस्तर पुढीलप्रमाणे .
मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे .यांमध्ये प्रामुख्याने विदर्भ , मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची तिव्रता अधिक होती . या भागातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झालेली आहे . विदर्भ , मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र भागांमध्ये तापमान हे 42 अंश ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान आहे . यांमुळे नागरिकांना तिव्र उन्हांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
दिनांक 28 एप्रिल पर्यंत असेल असा हवामान : हवामान तज्ञ पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 21 ते दिनांक 28 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील लातूर , परभरणी , धाराशिव , हिंगोली , नांदेड , जालना तसेच विदर्भातील यवतमाळ तर पुणे विभागातील कोल्हापुर , सांगली , सातारा , सोलापूर , पुणे तसेच अहमदनगरच्या अशा 13 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
सदर वरील नमुद जिल्ह्यांमध्ये दर दोन दिवसांनी पाऊस पडण्याची शक्यता आहे , अर्थात जर आजच्या दिवशी पाऊस पडल्यास दोन दिवसानंतर परत पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे .या कालाधीमध्ये वादळी वाऱ्याची देखिल शक्यता वर्तविण्यात आली असल्याने , शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची तसेच पशुधनाची योग्य ती काळजी घेण्याची चेतावणी दिली आहे .
तर दिनांक 20-26 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकाळ पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहेत . तर कोकणात 23 एप्रिल नंतर अवकाळी वातावरणातून दिलासा मिळेल , तर समुद्रकिनार पट्टीवरील दमटयुक्त उष्णतेचा प्रमाण अधिक राहील . तर विदर्भाचे तापमान 43 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहील . असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे .