Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Pramotion Pay Scale Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सुचना देणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात करण्यात आलेला आहे .
राज्य शासन सेवेतील दुर्गत तसेच मागासलेल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागांचा जलद गतीने विकास व्हावा याकरीता बिकट क्षेत्रांमध्ये शासकीय योजना प्रभवीपणे राबविण्याकरीता त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणेकरीता एकस्तर पदोन्नती देणेबाबत नविल सवलती देण्याची तरतुद 3 ( 7) नुसार पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे .
यांमध्ये आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पदोन्नती पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी एकस्तर वेतनश्रेणींमध्ये देण्यात येत असते . या संदर्भात मा.उच्च न्यायालयांने दिलेल्या निर्देशानुसार सा.प्र.विभागाच्या दिनांक 06.08.2002 च्या निर्णयामधील 3 ( 7 ) येथील तरतुदीचा अन्वयार्थ खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहेत . या संदर्भातील मुलभुत माहिती पुढीलप्रमाणे आहे .
मुळ नियुक्ती ही आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये झाली असल्यास त्या क्षेत्राबाहेर बदलीस पात्र नाही : जर मुळ नियुक्ती ही आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांस नियुक्तीच्या नंतर लगेच एकस्तर पदोन्नती योजना लागु होते व त्यानुसार तो ज्या पदावर कार्यरत आहे , त्याच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देय ठरत असते त्यानंतर आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही पुढीलप्रामणे आहे .
02.मुळ नियुक्ती ही आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये झाली असून त्यानंतर भविष्यांमध्ये बिगर आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये बदली झाली असल्यास अशा प्रकरणी त्या कर्मचाऱ्यांस देण्यात येत असलेला एकस्तर पदोन्नतीचा लाभ हा बंद करुन तो ज्या पदावर कार्यर असेल त्याच पदाची वेतनश्रणेी अनुज्ञेय हेाईल . या संदर्भातील पुढीलप्रमाणे कार्यवाही होईल .
03.जर मुळ नियुक्ती ही बिगर आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये झालेली असून त्यानंतर आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये बदली झाली असल्यास त्याचबरोबर आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना शासकीय सेवामधून सेवानिवृतत झाला असल्यास ,पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावीत ..
या संदर्भात राज्य शासनांच्या सा.प्र.विभगांकडून दिनांक 29.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.