Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee Remuneration Shasan Nirany ] : लोकसभा / विधानसभा / पोट निवडणूकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्याबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 06.06.2023 व दिनांक 17.11.2023 नुसार देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन महाराष्ट्र राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणूकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना द्यावयाचा भत्ता पुढीलप्रमाणे मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या गृह विभागातील पोलिस कर्मचाऱ्यांनाही वरीलप्रमाणे नमुद भत्याचे दर लागु असणार आहेत . त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी / कर्मचारी यांना वरील तक्यात नमुद करण्यात आलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय असणार आहे .
त्याचबरोबर दुर्गम प्रदेशातील मतदान केंद्रावर / मतमोजणी केंद्रावर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी , मोबाईल पार्टीमधील कर्मचारी , होमगार्ड , वनरक्षक ग्राम रक्षक दल , NCC कॅडेट्स , माजी सैनिक , स्वयंसेवक इ. करीता पॅक करण्यात आलेले दुपारचे जेवण आणि / किंवा हलका अल्पोहार प्रदान करण्यात येईल .
मतदान अधिकारी / कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले इतर अधिकारी / कर्मचारी यांना TA / DA ची अदागयी करण्याबाबत प्रकरणपरत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच अधिकारी / कर्मचारी यांना प्रवास भत्ता / दैनिक भत्ता देताना तो त्या-त्या वेळी अनुज्ञेय असणाऱ्या दराने देय असणार आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्र.विभागांकडून दिनांक 18.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..