Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty imp Paripatrak ] : इलेक्शन ड्युटी संदर्भात निवडणूक आयोगाकडून महत्वपुर्ण परीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य संदर्भात सूचना जारी करण्यात आलेले आहेत .

मुख्य निवडणूक आयोग कार्यालय मार्फत दिलेल्या निर्देशानुसार , पती- पत्नी जर दोघे जर सरकारी सेवेत आहेत , तर दोघांपैकी एकच जनांस निडणूक ड्युटी देता येणार असल्याचे सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . यानुसार जर पती-पत्नी यापैकी पती अथवा पत्नीस एकासच निवडणूक ड्युटी कर्तव्य पार पाडावे लागेल , कारण घरांमध्ये मुलांचा सांभाळ व इतर काही घरगुती अडचणीमुळे ही सुट मिळणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयोग कार्यालयामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे . याबाबत दोघांपैकी एकाची ड्युटी रद्द करणेकामी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कडे सविस्तर अर्ज सादर करावे लागेल , त्या आधारे जोडप्यापैकी एकास निवडणूक कर्तव्यातुन मुक्त करण्यात येईल .

शासन सेवेत दोघेही ( पती – पत्नी ) असल्याने , काही लडचणी लक्षात घेता दोघांपेकी एकाला सदर विनंती अर्जाच्या आधारे निवडणूक कामातुन सुट दिली जाईल . या निर्णयामुळे जोडप्यापैकी एकास निवडणूक कामातुन सुट मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *