Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Baba Ramdev & Acharya Balakrushn Ads Case ] : योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजलीचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवडा भरात जनतेची माफी मागावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) दिले आहेत .
बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांनी ॲलोपॅथी औषधांवर टीका करणारे जाहीरत प्रसिद्ध केल्याप्रकरणी यापुर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे . या प्रकरणी न्यायालयांमध्ये न्यायमुर्ती हिमा कोहली व न्या.अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर सुनावणीत म्हटले आहे कि , पतंजलीचे काम चांगले असेल परंतु पतंजली कंपनीला ॲलोपॅथीची बदनामी करण्याचा कोणताही अधिकार नाही , यामुळे न्यायालयांमध्ये बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्या उपस्थितीत त्यांची बिनशर्त माफीची दखल खंडपीठाकडून घेयात आली आहे .
मागच्या आठवड्यातील दिनांक 10 एप्रिल रोजी सदर प्रकरणी खंडपीठाने बाबा रामदवे व आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा स्विकारण्यास नकार देण्यात आलेला होता . तर काल दिनांक 16 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी मध्ये दोघेही मागण्याकरीता तयार असल्याचे सांगितले आहेत .
पतंजली कंपनीने दिशाभूल करणारी जाहीरात केल्याबद्दल दिनांक 17 ऑगस्ट 2022 पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयांमध्ये सुनावणी सुरु आहेत , यांमध्ये पतंजलीने असा दावा केला होता कि , पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होतात , यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेत न्यायालयांमध्ये धाव घेतली होती . या प्रकरणी आता पुढील सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयांमध्ये दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी होणार आहे .
तर बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना एका आडवड्याच्या आत माफी मागण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .