Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Congress jahirnama jahir ] : लोकसभा निवडणूका 2024 जिंकून सत्ता स्थापनेनंतर भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या महत्वपुर्ण बाबी दिले जातील , याबाबत आपला जाहीरनामा जाहीर करण्यात आले आहे . आता काँग्रेस पक्षाने देखिल शेतकऱ्यांच्या हिताचे महत्वपुर्ण बाबी जाहीरनाम्यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून अनेक लोकांना भेटून त्यांचे असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या , त्या समस्यांचे निराकरण सत्ता स्थापनेनंतर करण्याच्या उद्देशाने खूप विचार करुन जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे . या जाहीरनाम्यांमध्ये , काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहेत .
या जाहीरनाम्यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर प्रथम शेतकऱ्यांना दिलासा दिले जाईल , ज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल , त्याचबरोबर सध्य स्थितीमध्ये असणारे शेती विषयक बाबीवरील GST रद्द करण्यात येईल . सध्या खते , बियाणे , शेती विषयक अवजारे अशा सर्वच गोष्टींवर जीएसटीचा भरणा करावा लागतो , तर काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर अशा शेतीविषयक बाबींवर GST रद्द करण्यात येईल , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर डॉ.स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार MSP चा कायदा तयार करण्यात येईल ,याशिवाय सरकारी यंत्रणांमध्ये तब्बल 30 लाख रिक्त सरकारी पदांवर पदभरती करण्यात येणार , शिवाय अग्निवीर ही योजना पुर्णपणे बंद करण्यात येईल . तसेच हिंदुस्थानातील गरीब तसेच महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन सदर जाहीरनाम्यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
काँग्रेसचा जाहीरमाना जाहीर होतेवेळी राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , तसेच विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते मा.बाळासाहेब थोरात तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटी आदी पदाधिकारी उपस्थित होते .