Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan nirnay ] : सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते , सन 2024-25 या आर्थिक मागणी क्रमांक X-1 मुख्य लेखाशिर्ष 2236 – पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांचे मार्च 2024 व एप्रिल 2024 या महिन्यांच्या वेतनाकरीता एकुण 9000/- लक्ष ( अक्षरी नव्वद कोटी रुपये फक्त ) इतका  निधी वितरीत व खर्च करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

यांमध्ये पोषण आहार , विशेष पोषण आहार कार्यक्रम , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प , अंगणवाडी सेवा , वेतन , करीता एकुण 2250/- लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे .

तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान , सहाय्यक अनुदाने ( वेतन ) करीता एकुण 6,750/- लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्यात मान्यता देण्यात येत आहे .

सदरच्या निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना , नवी मुंबई हे असणार आहेत , या संदर्भात महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *