दुग्धव्यवसाय : या जातीच्या देशी म्हशी देते रोज 30 लिटर दुध , जाणून घ्या किंमत , व इतर सविस्तर माहिती !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ jafarabadi buffalo gives large milk ] : आपण जर शेतीसोबत दुग्ध व्यवसाय केला तर आपणांस मोठा आधार मिळू शकतो . दुग्धव्यवसायांमध्ये काही विशिष्ट जातीच्या म्हशी / गायींची निवड करणे आवश्यक असते , कारण चारा व मिळणारे दुध यांचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणे आवश्यक असते .

जाफराबादी म्हशी : जाफराबादी या म्हशी गुरात मधील सौराष्ट्र प्रदेशात सर्वाधिक असतात , यामुळे याचे उगम सौराष्ट्र मानले जाते , या म्हशीचे खाशीयत म्हणजे ही म्हैश दिवसाला तब्बल 30 लिटर इतके दुध देते , ही गाय गुजरातमधील गीर जंगलात व आसपासच्या भागांमध्ये ( जुनागढ , जामनगर , पोरबंदर , अमरेली  , राजकोट ) आढळते . या जातीच्या म्हशी वजनाचे खूप मोठे असतात , तर दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना ही म्हैश सर्वाधिक लाभदायक ठरते .

ही म्हैश दिसायला खुपच मजबुत व कोणत्याही परिस्थितीमध्ये तग धरु शकते , यास चारा अधिक लागतो , व पाण्याचे प्रमाणही अधिक लागते . जर एका दिवसाला ही म्हैस तब्बल 30 लिटर इतके दुध देण्यास सक्षम असते . यामुळे शेतकऱ्यांना ह्या जातीच्या म्हैस पालन केल्यास निश्चितचा मोठा आर्थिक फायदा होईल . सध्याच्या 60 /- रुपये प्रति लिटर प्रमाणे भाव पाहीला असता , 1800/- रुपये दिवसाला कमाई होईल .

किंमत : जाफराबादी म्हशीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जास्त काळ दुध देते , यामुळे या जातीच्या म्हशीची किंमत देखिल अधिक असते , याची किंमत 90,000/- रुपये पासून सुरवात होते ते 150,000/- रुपये पर्यंत या म्हशीची किंमत असते . आपणांस या जातीच्या म्हशी घ्यायचे असल्यास , गुजरातमध्ये सौराष्ट्र भागात जावून , प्रत्यक्ष म्हशींची निवड करावी .

Leave a Comment