Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान हे SBI च्या सीएमपी अथवा ई-कुबेर प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये करण्याचे निर्देश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक त्याचबरोबर जिल्हा परिषद , पालिका प्रशासन यांमध्ये कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन देयक कोषागार कार्यालयाकडून मंजूरी मिळाल्याच्या नंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश किंवा EFT शाळांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये जमा करण्यात येत असल्याने , संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असे .
यामुळे सदरचा विलंब टाळण्यासाठी राज्य शसनांकडून ई-कुबेर / एसबीआय सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . शोलेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , जिल्हा परिषदा शाळांमधील तसेच अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासूनचे वेतन हे सीएमपी प्रणालीमार्फत अथवा ज्या जिल्हयांत ई-कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यांत ई-कुबेर पद्धतीने थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
ज्या कार्यालयांमध्ये सदर पद्धतीने वेतन अदा करण्यास अडचणी येत आहेत . अशा उपकोषागार / कोषागार विभागांनी जिल्हा कोषागार विभागांशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दुर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भात शा.शि.विभाग मार्फत निर्गमित GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.