महाराष्ट्र शासनामार्फत अल्पभूधारक / इतर शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध खास अनुदान योजना ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Shasan Krushi Anudan Scheme ] : महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभाग मार्फत विविध योजना राबविण्यात येतात , ज्यांमध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट टक्के सबसिडी दिली जाते . ज्यामुळे आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य होते . ज्यांमध्ये अनुदान वाटप करताना अल्प भूधारक तसेच गरीब शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते .

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना सबसिडी अदा करुन राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक ( सुक्ष्म सिंचन घटक ) योजनांवर अधिक भर देण्यात आले आहे , जेणकरुन उत्पादनांमध्ये मोठी वाढ झाली आहे . ज्यांमध्ये शेतकऱ्यांना सिंचन साधणे व इतर सुविधा करीता 55 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते .

कृषी यांत्रिकीकरण उप – अभियान कृषी यांत्रिकीरण करीता प्रोत्साहर देणे तसेच शेती मधील उर्जे स्त्रोताचे वापर हे 2 किलावॅट / हेक्टर पर्यंत वाढविणे हा आहे . ज्यांमध्ये स्वयंचलित यंत्रे , ट्रॅक्टर , ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे , बैल चलित यंत्रे / अवजारे , काढणी पश्चात तंत्रज्ञान इ. कृषी यंत्र / अवजारे खरेदी करण्यासाठी राज्य शासनांकडून अर्थसहाय्यक करण्यात येते .

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – यांमध्ये अन्नधान्य , तेलबिया , ऊस व कापुस या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे , राज्यातील जिल्हानिहाय अनुदान पात्र पिके ठरविण्यात आलेले असून , सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदर पिकांची सुरक्षा / व्यवस्थापन करीता बियाणे , खत , इतर जैविक घटक , तणनाशके त्याचबरोबर पंप संच , पाईप , विविध कृषी अवजारे , शेततळे अशा विविध बाबींकरीता अनुदान देण्यात येते .

इतर महत्वपुर्ण अनुदान योजना –

  • बिससा मुंडा कृषी क्रांती योजना ( आदिवासी उप-योजना आदिवासी उप योजना बाह्य )
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
  • राज्य कृषी यांत्रिकीरण योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी संचिन योजना – वैयक्तिक शेततळे
  • डॉ.श्यामाप्रसाद मुख्यर्जी जन वन विकास योजना  

सदर योजनांबाबत अधिक माहितीसाठी राज्य शासनांच्या   https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या संकेतस्थळाला भेट द्या ..

Leave a Comment