Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bhajipala Bajarbhav Increase ] : मागील आठवड्यांपासून भाजीपाल्याचे बाजारभाव कडाडले आहे , बाजारभावांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे . सध्या विदर्भ , मराठवाडा भागांमध्ये कडक ऊन व वादळी वारे यांमुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .

यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली असल्याने , बाजारभाव वाढल्याने दिसून येत आहेत . राज्यात विदर्भ व मराठवाड्यांमध्ये भाजीपाल्याच्या दरांमध्ये तेजी आल्याचे दिसून आले . मराठवाड्यातील बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे पुढीलप्रमाणे दर पाहायला मिळाले .

यांमध्ये अद्रक 120 रुपये किलो , लसूण 120 रुपये , हिरवी मिरची 120 रुपये , शेवगा 120 रुपये , कारले 80 रुपये , बटाटे 30 रुपये , दोडके 100 रुपये , पत्ताकोबी 80 रुपये , फुलकोबी 80 रुपये , कोथिंबीर 10 रुपये जुडी , लिंबू 10 रुपयाला दोन ,भेंडी 80 रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव तेजित पाहायला मिळाला .

फळभाजीकिमान दर (प्रति क्विंटल )कमाल दर (प्रति क्विंटल )
गवार30007000
भेंडी14004000
घेवडा25006000
दोडका20004000
काकडी6001500
डांगर8001600
कारली25004000
गाजर8002000
हिरवी मिरची30007000
कोबी5001200
ढोबळी20005000
कारली25004000

सदरची भाव वाढ ही 10 रुपये ते 15 रुपये इतकी झाली असल्याने , भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे .पुढील महिन्यापर्यंत आणखीण भाजीपालाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे .

मराठवाडा व विदर्भांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले असून , उन्हाचे प्रमाणे अधिक असल्याने , शेतीमध्ये भाजीपालाचे प्रमाणे कमी झाल्याने , बाजारभावांमध्ये तेजी दिसून येत आहे . टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी कमान दर हे 800 रुपये तर सरासरी कमाल दर हे 1000/- रुपये इतके मिळत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *