Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Retire Employee IMP Shasan Paripatrak ] : दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करणेबाबत कार्यालय शिक्षण उपसंचालक , नागपुर विभाग , नागपूर मार्फत दिनांक 26 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28.06.2023 शासन निर्णयानुसार , जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत , व ज्यांनी मागील 12 महिन्यांची अर्हताकरी सेवा केलेली आहे .
अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक ( Notional ) वेतनवाढ विचारात घेवून , त्यांचे सेवानिवृत्तीवेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
व शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 07.07.2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षण विभाग करीता वित्त विभागाच्या दिनांक 28.06.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सुचनेप्रमाणे खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहेत . सदर परिपत्रकामध्ये महानगरपालिका , नगरपरिषदा , कटकमंडळे येथील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार नाही , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभाग नगरविकास विभागाच्या संदर्भ विषयानुसार महानगरपालिका , नगरपरिषदा , कटकमंडळे अंतर्गत 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या /होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत शासन परिपत्रक नाही , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत दिनांक 26 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.