Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Crops Rate ] : सोयाबीन , तुर , कापुस तसेच हरभरांच्या भावांमध्ये तेजी येत असल्याचे दिसून येत आहे . कारण सोयाबिनचे , तुर , कापुस या पिकांच्या भावांमध्ये मोठी निच्चांकी झालेली होती , त्यामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे .
सोयाबीन : सोयाबीनच्या दरांमध्ये मागील 2 दिवसात 50 ते 80 रुपया पर्यंतची वाढ झालेली होती , बाजारामध्ये सोयाबिनची आवक त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये खाद्य तेलांची असणारी मागणी यानुसार सोयाबिनच्या भावांमध्ये सुधारणा होताना दिसत आहे . सध्यस्थितीमध्ये सोयाबिनला प्रति.क्विंटल 4,400/- ते 4,600/- रुपये इतका भाव मिळत आहे , तर आंतर राष्ट्रीय बाजारांमध्ये सोयाबीनच्या भावात ( Rate ) मध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहेत .
आंतरराष्ट्रीय बाजार व आवक यानुसार सोयाबीनच्या दरांमध्ये चढ – उतार दिसूनच येणार असून , पुढील 02 महिन्यांत सोयाबिनचे दर हे 5200/- पर्यंत जाईल असा तज्ञांचे मत आहे , कारण बाजारांमध्ये आवक प्रमाण अत्यल्प आहे . यामुळे मागणी अधिक होईल , व दर वाढण्यास सुरुवात होईल .
तूर : तुरीला मागील 3 महिन्यापर्यंत 11,000/- प्रति. क्विंटल इतका भाव मिळत होता , परंतु सध्या तुरीच्या भावांमध्ये घसरण झाली असून , 9500/- ते 10,000/- दरम्यान स्थिर झाला आहे , तुरीच्या घटत्या आवक यामुळे तुरीच्या बाजारभावांमध्ये सुधारणा होत असताना दिसून येणार आहे .
कापसाच्या दरांमध्ये देखिल सुधारणा : कापसाचे दर हे आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये वाढल्याने , कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . कापसाचा भाव हा 7300/- रुपये ते 7800/- दरम्यान कायम होता , तर आवक कमी होत असल्याने , बाजारभावांमध्ये निश्चित वाढ होणार आहे , ही वाढ 8500/- पर्यंत स्थिर होईल .
हरभरा : हरभराला काढणीनंतर हरभराला प्रति क्विंटल 5500/- पर्यंत उच्चांकी भाव मिळाला होता सध्या आवक वाढली असल्याने , हरभऱ्याच्या भावामध्ये 200 ते 300 रुपयांची घट झाली आहे , यामुळे हरभराचा भाव 5200/- ते 5400/- रुपये पर्यंत स्थिर झाला आहे . पुढील दीड महिन्यांमध्ये हरभराच्या भावांमध्ये 100/- रुपये ते 200/- रुपयांची वाढ होवू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे .