Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maratha Survey Mandhan paripatrak ] : मराठा आक्षण बाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांकडून राज्यात सर्वेक्षण करण्याचे कामकाज राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेले होते , हे कामकाज अधिकारी / कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामकाज असल्याने , याकरीता अतिरिक्त मानधन देण्याचे कबूली राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली होती .
यामुळे महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत दिनांक 02 एप्रिल 2024 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करुन राज्यातील सर्वेक्षण कामी नियुक्ती सर्व पर्यवेक्षक व प्रशिक्षकांना मानधन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त ( सर्व ) यांना अदा करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेल आहेत कि , जिल्ह्यातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन जिल्हाधिकारी / आयुक्त यांनी कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहेत . पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडण्यात आलेली असून , त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रुपये 10,500/- रुपये तर प्रति प्रशिक्षक रुपये 10,000/- इतके मानधन हे संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच मानधन रक्कम संबंधितांना अदा करुन 02 महिन्यांच्या आतमध्ये उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहीत्यास 90 दिवसांच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे .
या संदर्भात महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगांकडून दिनांक 02 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.