Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Vanchit Bahujan Aghadi New Offer From Congress Party News ] : या लोकसभा निवडणूकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोठे योगदान घडणार असल्याने याचा थेट परिणाम राष्ट्रीय काँग्रेसच्या मतदानावर पडणार असल्याने , वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना नविन ऑफर राष्ट्रीय काँग्रेसकडून देण्यात आली आहे .
जागावाटपाच्या वादावरुन वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून , आपले उमेदवार सर्वत्र उभे करण्यासाठी उमेदवारांची घोषणा देखिल केली आहे . यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षातील उमेदवारांमुळे जे मतदान काँग्रेसला पडणार होते ,ते मत कमी होणार असून ,त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे . यामुळे वंचित पक्षाला परत महाविकास आघाडीमध्ये सामिल करुन घेण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत .
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर हात-मिळवणूक करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत . यांमध्ये काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा सदस्य , तसेच केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्याची नविन ऑफर दिली आहे . सध्याच्या लोकसभा निवडणूकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातुन माघार घ्यावे अशा प्रकारचा प्रस्तावच काँग्रेचे वरिष्ठ नेते अनिल अहमद यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे ठेवला आहे .
वंचित बहुजन आघाडी उमेदवारांमुळे BJP ला होईल मोठा फायदा : वंचित बहुजन आघाडी उमेदवारांमुळे काँग्रेसला मत कमी पडते , तर याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो . मागील लोकसभा निवडणूकांमध्ये असेच चित्र दिसून आल्याने , काँगेस पक्षांकडून प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरु आहेत .