Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment / Pension & Other Anudane Paripatrak ] : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन , वेतन / निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरण करणे संदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे मार्च व सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 या महिन्याचा वेतन व भत्ते , निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनायाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून लेखाशिर्ष निहाय संबंधित मुख्य कार्याकारी अधिकारी जिल्हा परिषदांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे .
सदरचा निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण , केंद्रीय शाळांची स्थापना , सहाय्यक अनुदाने , सहाय्यक अनेदाने ( वेतन ) , जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने , इ.बाबींकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .सदर खाली नमुद करण्यात आलेल्या परिपत्रकांमध्ये जिल्हा परिषद व लेखाशिर्षनिहाय निधीची तरतुद व वितरीत करण्यात आलेली तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .
सदर वितरीत केलेल्या तरतुदीमधन फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे , इतर कोणतेही देयके अदा करु नयेत , असे सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत . सदरच्या परिपत्रकानुसार एकुण चार हजार सातशे एकोणचाळीस कोटी सात लाख अठ्ठ्यांऐंशी हजार फक्त इतर रक्कम माहे मार्च व एप्रिल 2024 साठी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 04.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.