Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pay Scale Update ] : राज्यातील ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगांमध्ये वेतनत्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा संवर्गातील पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 16 मार्च 2024 रोजी अधिकृत्त शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 16 मार्च 2024 रोजी ज्या संवर्गातील वेतनत्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांकडून वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे , याकरीता ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेश प्रमाणे अशा संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटींचा सखोल अभ्यास करुन त्याबाबत अहवाल 06 महिन्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
पदांचा / संवर्गातील सुधारित वेतनश्रेणी सेवाप्रवेश नियम , कर्तव्ये व जबाबदाऱ्या इ. बाबींचा विचारात घेवून तपासणीअंती अशा प्रकरणांमध्ये त्रुटी आहे अशी त्यांची खातरजमा झाल्यास पदांच्या वेतनत्रुटी प्रकरण हे संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांना / विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी सदर गठीत समितीस प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
याकरीता ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वेतनश्रेणी मध्ये त्रुटी आहेत , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेस / महासंघास काही संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी बाबत निवेदने सादर करावयाची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभाग मार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच प्रशसकीय विभागाने या निवेदनांची तपासणी करुन वेतनसुधारणा संदर्भात आपला अहवाल राज्य शासनांस सादर करण्यात येणार आहेत .
यामुळे ज्या पदांच्या सातव्या वेतन आयोगानुसार त्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा पदांवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुख / विभागाचे सचिव यांना प्रस्ताव सादर करायचे आहेत . अथवा संघटनेमार्फत / महासंघामार्फत निवेदन सादर करायचे आहेत ..
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पाहण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.