Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain Update ]  : राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटीमुळे , पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे . प्रचंड उन्हांच्या वाढीमुळे देशांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसास सुरुवात झालेली आहे .

राज्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा विभागाचा विचार केला असता , उन्हांचे प्रमाणे सर्वाधिक वाढले आहेत , पुढील दोन दिवस हे विदर्भातील हवामान कोरडे असणार आहेत , यांमध्ये चंद्रपुर , अकोला , यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे . तर तापमानांमध्ये आजपासून 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे . तर राज्यात सोलापुर जिल्ह्यात उन्हाचे प्रमाणे अधिकच वाढणार आहेत .

तर चंद्रपुर , अकोला या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 05 एप्रिल तर यवतमाळला आज दिनांक 04 एप्रिलला उष्णतेचे मोठी लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान अंदाज वर्तविला आहे .

या भागांमध्ये पडणार अवकाळी पाऊस : राज्यातील कोकण , मराठवाडा विभागांमध्ये दिनांक 06 एप्रिल ते 08 एप्रिल या कालावधी मध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे , तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . दरम्यानच्या कालावधीमध्ये तापमान आणखीण 02 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .

वातावरणातील खालच्या थरामधील वाऱ्यांमध्ये एक द्रोणिय रेषा ही दक्षिण तामिळनाडू तर पुर्व विदर्भ पर्यंत येत असून , जी कि कर्नाटक व मराठवाड्यावरुन जाते , यामुळे पुढील काही दिवस राज्यांमध्ये तापमान हे कोरडे असणार आहे , त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची मोठी शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेने दिला आहे .

विदर्भ मधील ब्रम्हपुरी या ठिकाणी दिनांक 02 एप्रिल रोजी सर्वाधिक 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे , तर यावेळी मराठवाडा सह पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *