LIC ची जबरदस्त रिटर्न पॉलिसी : फक्त 200/- रुपये गुंतवणुकीवर मिळेल तब्बल 28 लाख रुपये ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC  Jeevan Pragati Policy ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत जीवन प्रगती पॉलिसी अंतर्गत फक्त 200/- रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 28 लाख रुपयांचा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे , या पॉलिसी करीता असणारी आवश्यक अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

जीवन प्रगती योजनाची खास वैशिष्ट्ये : या पॉलिसीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कमीत कमी 12 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षाच्या मुदती करीता घेता येते . ज्यांमध्ये वय वर्षे 12 ते 45 वर्षे मधील व्यक्ती ह्या पॉलिसी मध्ये गुंतवणूक करु शकतो . सदर विमा कालाधीमध्ये मध्ये पॉलिसीधारकाचे मृत्यु झाल्यास , विम्याची रक्कम बोनस व अंतिम बोनस रक्कम मिळून विमा लाभ वारसदारास दिला जातो .

28 लाख रुपये पर्यंतचा लाभ कसा मिळेल : भारतीय आयुर्विमा महामंडळच्या जीवन प्रगती प्लान खरेदी केल्यास , यांमध्ये आपण प्रति दिवस 200/- रुपये बचत केल्यास आपणांस मासिक 6000/- रुपये इतका प्रिमियम रक्कम भरावी लागेल , तर वार्षिक 72,000/- रुपये प्रिमियम जमा होईल , ज्याची कमीत कमी 12 वर्षे तर जास्तीत जास्त 20 वर्षे इतकी मुदत असेल .

वरीलप्रमाणे प्रतिदिन 200/- रुपये बचत केल्यास आपणांस 20 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर 28 लाख रुपयांचा आर्थिक फायदा होईल . ज्यांमध्ये बोनस रेट अधिक आहे , कारण वरील प्रमाणे आपण या पॉलिसी मध्ये गुंतवणुक केल्यास आपले 20 वर्षाचे प्रति वर्ष 72,000/- प्रमाणे 14,40,000/- इतकी रक्कम जमा होते , व आपणांस मुदतीनंतर 28 लाख रुपये इतका लाभ मिळतो , म्हणजेच बोनसची रक्कम ही 13,60,000/- इतकी असणार आहे .

यामुळे उज्वल भविष्याकरीता या योजनांमध्ये पैसे गुंतवणे अधिक लाभदायक ठरणार आहे , पॉलिसी खरेदी करण्यासाठी एलआयसी ऐजंट अथवा थेट LIC ऑफीसला भेट देवू शकता ..

Leave a Comment