Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee Insurance News ] : निवडणुक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे अत्यंत जबाबदारीचे काम करावे लागते . या वेळी ज्या ठिकाणी निवडणुक आहे अशा ठिकाणी त्यांची योग्य प्रकारे व्यवस्था होत नसल्याचे अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या तक्रारी येतात , परंतु निवडणूकांचे काम हे अग्रस्थानी असल्याने , ते निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांना बिकट परिस्थिती मध्ये देखिल करावेच लागते .
निवडणूक कामकाजांमध्ये निवडणूक कालावधी संपेपर्यंत सदर अधिकारी / कर्मचारी हा त्याच्या मुळ आस्थापनेतुन कार्यमुक्त असतो , तर निवडणूक कामी प्रतिनियुक्तीने कार्यरत असतो , हा आदेशातील कामकाज सर्वांना करावे लागते , अन्यथा कायदेशिर कार्यवाही होत असतो . या कालावधीमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना आता संकट ओढवल्यास अनुदानाचे कवच देण्यात येणार आहेत .
30 लाख रुपये पर्यंत मिळणार लाभ : निवडणूक कामासाठी अधिकारी / कर्मचारी घरातुन निघाल्यापासून ते निवडणूक ठिकाणी आणि तेथून घरी परत येई पर्यंत निवडणूक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना रुपये 30 लाखांच्या अनुदानाचे सुरक्षा कवच देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .
या पुर्वी निवडणूक कामी कर्तव्यावर असताना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियास 10 लाख रुपयांचे अनुदान देणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 20.06.2016 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , तसेच अतिरेकी कारवाया , बॉम्बस्फोटासह अन्य घटना मध्ये मृत्यु यांमध्ये निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्यास 20 लाख रुपये तर कायमचे अपंगत्व आल्यास त्यांना 10 लाख रुपये आणि कर्तव्यावर असताना अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय यापुर्वी राज्य शासनांकडून घेण्यात आलेले आहेत .
💁💁 हे पण वाचा : शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अनुदान रक्कमेमध्ये वाढ : सदर निवडणुक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांना संकट ओढवल्यास , मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 30 लाख रुपये अनुदानाचे कवच देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार निवडणूकीचे काम पार पाडून घरी येईपर्यंत दुर्देवी घटना झाल्यास , त्यांच्या कुटुंबियांना सदर अनुदान दिले जाणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.