Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election Duty Work Remuneration ] : लोकसभा निवडणुका 2024 कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना अदा करावयाचे मानधन बाबत कार्यालय मुख्य निवडणूक अधिकारी , दिल्ली यांच्या मार्फत दिनांक 22.03.2024 रोजी पत्र निर्गमित करण्याात आलेला आहे .

निवडणुक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये , लोकसभा निवडणूका 2024 करीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या करीता कमीत कमी अदा करावयाचे मानधन हुद्दाप्रमाणे सविस्तर पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रकामकाज पदमानधन
01.Sector Officer5,000/- Lum Sum
02.Master Trainer2,000/- Lum Sum
03.Presiding Officer  Counting Supervisor / Reception Supervisor350/- Per Day
04.Polling Officers / Counting Assistant / Reception Assistant250/- Per Day
05.Class – iv / MTS200/- Per Day
06.Packed Lunch And / or Light Refreshment150/- Per Day
07.Video Surveillance Team , Video Viewing Team , Accounting Team , Expenditure Montitoring Control Room And Call Center Staff , Media Certification And Monitoring Committee , Flying Squads , Static Surveillance Team , Expenditure Monitoring cellClass – I/II = 1200 Lum sum   Class – III = 1000 Lum sum   Class – iv = 200 Per Day    
08.Micro Observer1000/- Lum sum
09.Assistant Expenditure Observer7500/- Lum Sum For Full Time Duty

किती दिवसाचे मानधन दिले जाते ? यांमध्ये प्रशिक्षण , मतदान साहित्य गोठा करणे इत्यादीसाठी जास्तीत जास्त 04 दिवस तर प्रत्यक्ष मतदानाचे 02 दिवस असे एकुण 06 दिवस ग्राह्य जातील . म्हणजेच 06 दिवसांचे मानधन ग्राह्य धरण्यात येतील , तर राखीव कर्मचाऱ्यांकरीता 04 दिवस प्रशिक्षणाचे व एक दिवस मतदानाचा असे एकुण 05 दिवसाचे मानधन अदा करण्यात येतील .

यांमध्ये  Reception Duty Staff आणि The Voter Assistant Booth Staff करीता 2 दिवस प्रशिक्षणाचे व 01 दिवस मतदानाचे असे एकूण 03 दिवसाचे मानधन दिले जातील . तर Counting Duty Staff / MTS – IV / Volunteers करीता 2 दिवसांसाठी मानध दिले जातील ..

या संदर्भात निवडणूक आयोगाकडून दिनांक 22.03.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *