Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Oil Crops Increase priductity Price , Vishaesh Kruti Scheme ] : सन 2023-24 मध्ये कापुस , सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्याकरीता पुर्विनियोजनाचे उपलब्ध झालेला रुपये 220.86 कोटी निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 30 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्याचे मा.उप मुख्यमंत्री महोदयांनी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणंमध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील उत्पादकता वाढावी , तसेच या पिकांची मुल्यसाखळीमध्ये , शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातुन कापूस , सोयाबीन , तसेच भुईमुग , सुर्यफुल , करडई , मोहरी , तीळ व जवस या अन्य तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढी बरोबरच मुल्य साखळी विकास करीता सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षाच्या कालावधीत राबवावयाच्या रुपये 1000.00 कोटी खर्चाच्या विकासासाठी सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षाच्या कालावधीत राबवावयाच्या , रुपये 1000 कोटी खर्चाच्या …

यांमध्ये कापूस 450 कोटी व सोयाबीन व इतर तेलबिया पिके रुपये 550 कोटी करीता विशेष कृती योजना राबविण्यास दिनांक 12 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे . त्यानुसार सन 2022-23 मध्ये या विशेष कृती योजना करीता राबविलेल्या कार्यक्रमाप्रमाणे रुपये 145.00 कोटी यांमध्ये कापूस रुपये 75.00 कोटी व तेलबिया रुपये 70.00 कोटी इतका निधी दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .

सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 मध्ये एकात्मिक कापुस , सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासाकरीता विशेष कृती योजना करीता रुपये 220.86 कोटी निधी सदर निर्णयानुसार आयुक्त कृषी , पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . यांमध्ये नमुद केल्यानुसार ,

सन 2023-24 मध्ये एकात्मिक कापूस , सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास करीता विशेष कृती योजना करीता रुपये 220.86 कोटी निधी हा पीक संवर्धन , कापूस , सोयाबिन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासाठी विशेष कृती योजना तसेच अर्थसहाय्य या लेखाशिर्ष खाली खर्ची टाकरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 30 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *