Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Cancel Reason ] : आपण जर शासकीय कर्मचारी असाल आणि आपल्याला लोकसभा 2024 साठी ड्युटी दिलेली असल्यास , आपल्याला निवडणुक आदेश रद्द करायचा असल्यास ,खाली नमुद परिशिष्ठामध्ये नमुद आपले कारण असले तरच रद्द करता येईल . कोणते कारणासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये अधिाकरी / कर्मचारी दिव्यांग , गरोदर ( महिला ) , तसेच अत्यावश्यक सेवेत असल्यास निवडणुक आदेश रद्द करता येईल . तसेच अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता असल्यास , तसेच अधिकारी / कर्मचारी निलंबित / फरार तसेच दीर्घ मुदतीचे रजेवर असल्यास निवडणुक आदेश रद्द करता येते . तसेच अधिकारी / कर्मचारी दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत असल्यास , तसेच अधिकारी / कर्मचारी गंभीर आजारी असल्यास निवडणुक आदेश रद्द करता येते .इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत .
- अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असल्यास ( यांमध्ये देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्विकारण्यात येणार नाही . )
- अधिकारी / कर्मचारी शासकीय कामानिमित्त परदेशी / देशांतर्गत प्रवास करीत असल्यास .
- अधिकारी / कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील दुबार आदेश असल्यास..
- अधिकारी / कर्मचारी हे निवडणूकीचे कामासाठी अन्य विधानसभा मतदासंघाडे कार्यर असल्याबाबत ..
- कर्मचारी चतुर्थ श्रेणी / वर्ग 4 मध्ये कार्यरत असलेबाबत , तसेच कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / वर्ग 4 मध्ये करीत असलेबाबत ..
- अधिकारी / कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असल्यास ..
- अधिकारी / कर्मचारी मयत झाले असल्यास ..
- अधिकारी / कर्मचारी यांचा अपघात झाले असल्याबाबत ..
- अधिकारी / कर्मचारी यांचा स्वत : चा अथवा मुलाचा मुलीचा विवाह असल्याबाबत ( यांमध्ये मतदान दिनांक पुर्वी व नंतर 3 दिवस ) इतर नाते संबंधातील अर्ज स्विकारले जाणार नाहीत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.