Spread the love

Live Marathi pepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Farmer IMP Shasan Nirnay GR ] : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यांमधील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार , विद्युत वितरण कंपनीला वीज दरांमध्ये सवलत देण्यात येत असते , व त्याची प्रतिपुर्ती शासनांकडून वितरण कंपनीस केली जाते असते , वितरण कंपन्यांना कृषीपंप ग्राहकांना वीज सवलतीकरीता सन 2023-24 करीता 7355.91 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आलेली आहे .

सन 2023-24 या वर्षाचे खर्चाचे पुरक विवरणपत्र दिनांक 07.12.2023 रोजी विधानमंडळास सादर करण्यात आले , सदर पुरवणी खर्चास आता विधासभेने मान्यता दिली असल्याने , दिनांक 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास मा.राज्यपालांनी संमती दिलेली आहे . सदर शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .

कृषीपंप ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी सन 2023-24 करीता सुधारित अंदाजात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या रुपये 7355.91 कोटी रक्कमेपैकी 411,24,00,000/- अक्षरी- चारशे अकरा कोटी चोविस लाख रुपये फक्त रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत यांना रोखीने वितरीत करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे .

सदर प्रयोजनासाठी होणरा खर्च हा वीज , पारेषण , वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार , वीज दरात सवलत , कृषीपंप ग्राहकांना वीजदर सवलत , अर्थसहाय्यक या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *