Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This Year Rain Update News ] : मागील वर्षी देशांमध्ये उन्हाळामध्येच पाऊस सर्वाधिक पडला होता , यामुळेच राज्यात मराठवाडा , विदर्भातील खरीब हंगामामध्ये कमी पाऊस पडला , तर रब्बी हंगामामध्ये पाऊस खुप कमी पडला यामुळे पिकांचे उत्पादन खुप कमी प्रमाणात झाले आहेत .
तर यंदाच्या खरीब हंमामामध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पडण्याची मोठी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे . आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेंट सेंटर ही आशियामधील हवामान अंदात वर्तविणारी विश्वस्त संस्था आहे . सदर सेंटरने दिलेल्या हवामान अंदाजानुसार भारतात माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे .
त्याचबरोबर पुर्व आर्फिका ते अरबी सागर , भारत , इंडोनेशिया , बंगालचा उपसागर , दक्षिण पॅसिफिक पर्यंतचा प्रदेश , तसेच ध्रुवीय उत्तर अटलांटिक भागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत .
तसेच भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एल निनोमुळे यंदा तीव्र उष्णता असणार आहे , तर तीव्र उन्हाळी हंगामानंतर अल निनो निष्क्रिय होण्याची शक्यता असून , ला नीनामुळे भारतांमध्ये यंदाच्या वर्षी उत्तरार्धात सर्वाधिक पाऊन पडण्याची मोठी शक्यता आहे .
यामुळे यंदाच्या वर्षी भारतांमध्ये शेतीपिकांसाठी मुबलक प्रमाणात पाऊसाची उपलब्धी होणार आहे .