Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Retire Employee Benefit After Retirement ] : निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान , सहायक अनेदाने ( वेतनेतर ) मंजुर करणेबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत दिनांक 26 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षातील निवृत्तीवेतनाचे लाभ अदा करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता , इतर अशासकीय संस्थांना सहाय्य इतर अशासकीय संस्थांना सहाय्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी सहायक अनुदान , सहायक अनुदाने रुपये 21,15,72,000/- इतके अनुदान प्राधिकरणास शासन निर्णयांमध्ये नमुद अटी व शर्तींच्या आधारे मुक्त करण्यात येत आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सदर शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात येणारे अनुदान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सन 2023-24 मधील निवृत्तीवेतन लाभांसाठी मंजूर असल्याने , या अनुदानामधील रकमेचा खर्च त्याच कामांसाठी होईल याची दक्षता घेण्याचे तसेच पुर्वीच्या थकीत सेवानिवृत्तीवेतन लाभाकरीता सदर निधीचा वापर करु नये असे सुचित करण्यात आलेले आहेत .
तसेच यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीविषयक लाभ दीर्घकाळ प्रलंबित राहणार नाहीत , याची प्राधिकरणने दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन विषयक लाभ अदा करताना जुनी प्रकरणे प्राथम्याने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांची कालानुक्रमे यादी तयार करुन त्या आधारे प्राथम्यक्रमाने निवृत्तीवेतन विषयक लाभ अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 अखेर प्राधिकरणाकडे जमा झालेले तांत्रिक शुल्क व ईटीपी चार्जेस शासनाकडे त्वरीत जमा करण्याचे तसेच मार्च 2024 अखेर जमा होणाऱ्या रक्कमा चालू वित्तीय वर्षातच जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत दिनांक 26 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..