Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Hair Falls Stops Diet ] : आपले केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर , केसांची गळती थांबविण्याकरीता आपल्या आहारांमध्ये बदल करणे आवश्यक आहेत , तर काही गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक असेल .

विशिष्ट वयानंतर केसांची गळती साहजिक आहे , परंतु कमी वयांमध्येच केसांची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्यास , आपल्या आहारांमध्ये बदल करणे अपेक्षित आहे . केसांची वाढ तसेच योग्य प्रकारची काळजी घेण्यासाठी लोह व तंतुयुक्त युक्त आहारांचा समावेश करणेआवश्यक असेल .आपल्या शरीरांमध्ये लोहांची कमतरता झाल्यास , केस कमकुवत आणि निर्जिव होवून गळण्यास सुरुवात होते .

केस गळती कमी करण्यासाठी आपल्या आहारांमध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असेल – जे कि आपल्याला खजूर , डाळिंब , कडधान्ये , हिरव्या पालेभाज्या , काळे मनुके तसेच मोरिंया या पदार्थांमधून सर्वात जास्त मिळते  . यांमध्ये आपण जर डाळिंबाचा रस आहारात समाविष्ठ केल्यास आपणास सर्वाधिक लाभ मिळतो .

याशिवाय आपल्या आहारांमध्ये बीट रुटचा रस , गाजर , सफरचंद या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा .त्याचबरोबर जर अन्न पदार्थ जर लोखंडी भांड्यांमध्ये शिजवून त्या अन्नाचे नियमित सेवन केल्यास आपल्या शरीरातील लोहाचे तुट निश्चित भरुन निघेल . तसेच पिस्ता , काजु , बदाल तसेच भोपळ्याच्या बिया , तीळ , गडद हिरव्या भाज्या व मशरुम अशा पदार्थांचा सेवन करा .

ज्यांमुळे आपल्या शरीरांमध्ये लोहाची मात्र वाढून , केस गळतीचे प्रमाण कमी होईल व केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *