Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Kisan Sanman Nidhi Scheme 17 th Installment update ] : शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 17 हप्ता मिळवायचा असेल तर , आता सर्व च शेतकऱ्यांना ई – केवायसी पुर्ण करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहेत .
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी दरवर्षी 6000/- रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून करण्यात येते , याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान या योजना अंतर्गत वार्षिक 6000/- रुपये इतकी आर्थिक सहाय्य करण्यात येते , यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000/- रुपये इतकी आर्थिक सहाय्य होते .
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी येाजना अंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहेत , आता 17 वा हप्ता मिळणार आहे , परंतु त्या आधी शेतकऱ्यांना ई-केवायसी ( E-KYC ) पुर्ण करावी लागणार आहे . शेतकऱ्यांना 17 वा हप्ता हे माहे मे महिन्याच्या शेवटी अथवा जून महिन्याच्या सुरुवातील मिळण्याची शक्यता असल्याने , ज्यांचे ई-केवायसी पुर्ण अशांनाच 17 व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे .
यावेळी ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे मिळणार नाहीत , तसेच बँके खाते हे आधार कार्डशी लिंक करणे अत्यावश्य आहे , जर आधार कार्ड लिंक नसल्यास यावेळी 17 वा हप्ता मिळणार नाही . नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6000/- इतकी वार्षिक रक्कम खात्यांमध्ये जमा झालेली आहे .
यामुळे ज्यांचे अद्याप ई-केवायसी पुर्ण झालेली नाही ,अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी पुर्ण करुन घेणे आवश्यक असणार आहेत .जर आपल्याला यापुर्वीचे हप्ते मिळाले नसल्यास , pmkisanict@gov.in या मेलवर मेल करुन माहिती घेवू शकता , अथवा 1800115526 , 01123381092 या नंबरवर कॉल करुन माहिती प्राप्त करु शकता ..