Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Amount Withdrawal From GPF GR ] : भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्याकरीता भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम ( ना परतावा ) काढण्यास मंजूरी देणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर दिनांक 31 मे 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , शासन असा आदेश देत आहे कि , महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 मधील नियम क्र.16 नुसार वर्गणीदारांची 10 वर्षांची सेवा पुर्ण झाल्याच्या नंतर खंड झाला असल्यास , खंडीत सेवेचा समावेश करुन अथवा नियत सेवा निवृत्तीपुर्वी 10 वर्षे यापैकी जे आधी घडेल त्यावेळी , वर्गणीदाराच्या खाती जमा असणारी निधीच्या रकमेतून स्वत : च्या अथवा महाराष्ट्र …

सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 च्या नियम 2 ( 3 ) मधील कुटुबांच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असणाऱ्या वर्गणीदाराच्या कुटुंबातील व्यक्तींच्या धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी रक्कम काढण्याकरीता पुढील अटी / शर्तींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहेत . सविस्तर अटी / शर्ती पुढीलप्रमाणे आहेत .

सदर शासन निर्णयानुसार सदर धार्मिक यात्रेचा खर्च अथवा त्यांच्या खात्यावर जमा असणाऱ्या निधीच्या अर्धी रक्कम अथवा वर्गणीदाराचे 06 महिन्यांचे वेतन यापैकी कमी असणारी रक्कम मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . सदर धार्मिक यात्रेच्या खर्चाची रक्कम ही वर्गणीदारास आपल्या संपुर्ण सेवा कालावधीमध्ये फक्त एकदाच अनुज्ञेय असणार आहे .

या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31 मे 2014 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *