लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात , राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 31 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण नविन शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 01 एप्रिल 2010 व दिनांक 05. 07. 2010 च्या शासन निर्णय नुसार अनुक्रमे पदोन्नतीची संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील कर्मचारी यांना यापूर्वी कार्यान्वित असलेली सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित करून “सुधारित आश्वासित प्रगती योजना ” या नावाने लागू करण्यात आली आहे .
राज्यातील अ कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना रद्द करण्यासंदर्भात दिनांक 07.12.2018 दिनांक 16.02.2019 व दिनांक 25.08. 2022 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत . त्याचबरोबर शासन निर्णय 07.12 2018 व दिनांक 16.02.2019 निर्गमित होईपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार लाभ देण्यात आली आहेत ते कायम ठेवणे , त्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यास सदर शासन निर्णय मंजुरी देण्यात येत आहे .
सदर योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या अंदाजे 38 कोटी एवढ्या वार्षिक आवर्ती खर्च राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे . या संदर्भात वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 184 /23 दिनांक 25 एप्रिल 2023 प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे .
सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात राज्य शासनाकडून दि.31 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .
आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !