Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion , One Increament Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याच्या नंतर एक वेतनवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 20 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

ग्रामविकास विभागाच्या दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याची बाब नमुद आहे . सदर निर्णयाचा संदर्भा घेवून दिनांक 20 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागांकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सदर वरील नमुद शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून पदोन्नतीनंतर वेतननिश्चिती करताना वरील नमुद कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ लागु असेल , त्या ऐवजी सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून सदर वेतनवाढ लागु असणार असल्याची सुधारणा प्रस्तावित आहे , त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागांकडून विहीत नमुन्यात माहिती मागविण्यात आलेली आहे .

यांमध्ये संवर्ग , मंजूर पदे , कार्यरत पदे , सेवानिवृत्त पदे , तसेच पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून वेतनवाढ मिळाल्याच्या वार्षिक वाढीव आर्थिक भार इ. माहिती मागविण्यात आलेली आहे . या संदर्भात ग्रामविकास विभागांकडून दिनांक 20 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *