Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Vote Form Home ] : भारत निवडणुक आयोगाने आता वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना घरातुनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . या सुविधाचा लाभ घेण्याकरीता सदर वयोवृद्ध मतदारांना व दिव्यांगाना 12 डी नमुन्याचे फॉर्म वाटप करण्यास निवडणुक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून वाटप करुन जमा करण्याचे कामास सुरुवात झाली आहे .
85 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे तसेच 40 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असणारे दिव्यांग मतदारांना आता घरपोच पोस्टल बॅलेट पेपर द्वारे मतदान करता येणार आहेत , त्याकरीता आवश्यक असणारा नमुना 12 डी हा केंद्र अधिकारी यांच्या मार्फत भरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत .
सध्या पुढील महिन्यात 19 तारखेला नागपुर विभागांमध्ये मतदानाचा पहिला टप्पा होणार असून , यांमध्ये 85 व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना निवडणुक अधिकाऱ्यांकडून घरपोच मतदान करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी कार्य प्रगतीपथावर केले जात आहेत .
निवडणुक आयोगांकडून अशा प्रकारचे सुविधा देण्याचा पहिलाचा प्रयत्न असल्याने देशातील वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहेत . कारण वयोवृद्ध व दिव्यांग मतदार नेहमीच मतदान करण्यापासुन वंचित राहील्याचे दिसून आल्याने या प्रकारचा अनोखा उपक्रम भारत निवडणुक आयोगाकडून राबविण्यात येत आहेत .