Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmers Stamp Duty News ] : आचार संहिता लागु होण्याच्या अगोदरच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून , महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांने मोठी महत्वपुर्ण घोषणा केली आहे .

लोकसभेच्या निवडणूका पुर्वीच केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , यांमध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना करीता उर्वरित हप्त्यासाठी निधीचे वितरण करण्यात आले आहेत , तर महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांकरीता निधीचे वितरण करणेबाबत , निर्णय घेण्यात आलेले आहेत . तर राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्य सरकारने 1,60,000/- रुपये पर्यंतच्या कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे . त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ( किसान क्रेडिट कार्ड ) जारी करण्यात आले आहेत . या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जन समर्थ हा डिजिटल पद्धतीचा प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे .

या डिजिटल प्रकल्प अंतर्गत बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांना एका क्लिकवर किसान क्रेडिट कार्ड द्वारे खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यात आली . या डिजिटल पद्धतीने कर्ज सुविधाचा लाभ बिड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे .

तसेच सरकारने किसान क्रेडिट कार्ड डिजिटायझेशन करीता महाराष्ट्र राज्यातील बीड या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याने आहे , यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन मोबाईलद्वारे कर्ज सुविधाचा लाभ प्राप्त होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *