Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pay Scale GR ] : राज्य शासन सेवेतील खाली नमुद कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 18 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार उद्योग , उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 16 मार्च 1968 च्या शासन निर्णयानुसार कामगार समाज शिक्षण संस्था नागपुर या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे , ही योजना दिनांक 11 मे 1977 च्या शासन निर्णयानुसार सन 1977 -78 पासून शिक्षण व सेवायोजन विभागांकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 नुसार सदर संस्था नोंदणीकृत करण्यात आलेली आहे . सदर संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बडकस आयोग , भोळे आयोग तसेच 4 थ्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतनश्रेण्या लागु करण्यात आलेल्या आहेत .

श्रमिक विद्यापीठ नागपूर या संस्थामधील दिनांक 01 जानेवारी 2006 पासून कार्यरत असणाऱ्या व त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगानुसार पुढीलप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येत आहेत .

संवर्ग5 वा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी6 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
अधिक्षक / लेखापाल5000-8000/-9300-34800/- ग्रेड पे 4200
लघुटंकलेखक4000-6000/-5200-20200/- ग्रेड पे 2400
शिपाई2550-3200/-4440-7440/- ग्रेड पे 1300

वरील 03 संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीचे देय लाभ दिनांक 01 जानेवारी 2006 पासुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 18 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *