Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Pramotion System ] : राज्यात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून केंद्र सरकारच्या नविन राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत , यांमध्ये असणारे विविध तरतुदी राज्यात टप्याटप्याने लागु करण्यात येत आहेत . यांमध्ये प्रामुख्याने पदोन्नतीची प्रक्रिया खाजगी / कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवर आधारीत पदोन्नती दिली जाणार आहे .

तर बदल्यांची प्रक्रिया देखिल बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत . राज्यात केंद्र सरकारच्या नविन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी कोरोना महामारीमुळे विलंबाने पुढील वर्षांपासून लागु करण्यात येत आहेत . येत्या जुन महिन्यांपासून नविन शैक्षणिक धोरण लागु करण्यात येणार असून , यानुसार इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे .

मागील धोरणांनुसार 8 वी पर्यंत नापास करता येणार नसल्याची तरतुद आता काढून टाकण्यात येणार आहे , तर इ.5 वी व 8 वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी लगेच मिळणार आहे . जर परत नापास झाल्यास , परत त्या विद्यार्थ्यांस त्याच वर्गात बसावे लागेल .

पदोन्नती / बदली संदर्भात विशेष तरतुद : यांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात विशेष तरतुद नमुद असून , खाजगी तसेच कार्पोरट क्षेत्रांमध्ये जसे पदोन्नती कामगिरीच्या ( परफॉर्मन्स ) आधारावर करण्यात येते , त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षकांची पदोन्नती ही सेवाज्येष्ठता ऐवजी कामगिरीच्या आधारावर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत . तर बदली प्रक्रिया देखिल बंद करण्यात येणार आहेत .

कारण नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( New Education Policy ) च्या प्रकरण मुद्दा क्र.15 ते 21 यांमध्ये या संदर्भात सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , कि चांगले ( उत्कृष्ट ) कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे , अशा उत्कृष्ट शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली पाहिजे . तसेच चांगली कामगिरी बजावणाऱ्यांना पगार वाढ देखिल देण्यात यावेत , अशी तरतुदी आहे .

यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारावर तसेच त्यांचे योग्य मापदंड , योग्य प्रकारे मुल्यांकन करुन शिक्षकांना पगारवाढ तसेच पदोन्नती दिली जाणार आहे . यांमध्ये पगारवाढ , पदोन्नतीसाठी कार्यकाळ तसेच वरिष्ठता यांच्या आधारावर पदोन्नती तसेच पगारवाढ हा मुद्दा यापुढे अवलंबुन राहणार नाही .  

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *