Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election Acharsanhita Rules ] : देशात लोकसभेच्या निवडणुका 7 टप्यात घेण्याचा तर राज्यात पाच टप्यात मतदान घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगांकडून घेण्यात आलेला आहे . सदर निवडणुका करीता काल दिनांक 16 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे  , तर सदर आचासंहिता काळांमध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे लागते , याबाबत सविस्तर महत्वपुर्ण नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..

  • सदर काळांमध्ये उमेदवारांना मतदारांना कोणत्याही प्रकारे धमकावता येत नाही .
  • अफवा तसेच चुकीच्या बातम्या ( फेक न्युज ) पसरविणे कायदेशिर गुन्ह्यास पात्र असेल .
  • सदर प्रचार काळांमध्ये लहान ( अल्पवयीन ) मुलांचा वापर करणे कायदेशिर कार्यवाहीस प्राप्त असेल .
  • सदर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा ( हिंसेचे वातावरण ) होणार नाही , याकरीता काळजी घेणे आवश्यक असेल .
  • समाजांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होईल अशा प्रकारची कोणतीही कृती करता येत नाही .
  • उमेदवारांस जात , धर्म तसेच पंथ या आधारावर मतदान मागता येत नाही ..
  • उमेदवारांस जर प्रचार सभा , तसेच रॅली अथवा मिरवणूक काढायची असल्यास त्यास पुर्वी रितसर पोलिसांची पुर्वपरवानगीची आवश्यक असेल .
  • सदर काळांमध्ये उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवर जावून टिका तसेच धार्मिक द्वेषपुर्ण विधाने करु नयेत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *