राज्यातील अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदान बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.15.03.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Anudanit School Employee Payment shasan Nirnay ] : राज्यातील मान्यता प्राप्त असणाऱ्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक .15 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार दिनांक 19.01.2013 मधील तरतुदीनंसार राज्यातील मान्यता असणाऱ्या प्राथमिक , माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना 52,08,20,200/- रुपये इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहेत . याकरीता निर्णयांमध्ये अटी / शर्ती नमुद करण्यात आलेले आहेत , यांमध्ये 100 टक्के वेतनेतर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक 01 एप्रिल 2008 रोजी देय असणाऱ्या 5 व्या वेतन आयोगानुसार , वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5 टक्के वेतनेतर अनुदान देय असणार आहेत .

तसेच बालकांच्या मोफत तसेच सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशानुसार , दिनांक 30 मार्च 2013 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार , सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या प्रत्यक्ष सुरु शाळांना प्राधान्य देवून वेतनेतर अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 11.12.2020 रोजीच्या निर्णयानुसार खाजगी अंशत : / पुर्णत : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्याकरीता वेतनेतर अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरचा निधी लेखाशिर्षनिहाय तरतुद पुढीलप्रमाणे वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment