Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Insurance Amount Paid GR ] : राज्यातील निर्णयांमध्ये नमुद विभागातील दिवंतगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करणेबाबत ,जलसंपदा विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी सामाजिक सुरक्षा व कल्याण , इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम , ठेव संलग्न विमा योजना , शासकीय भविष्य निर्वाह निधी ठेव संलग्न विमा योजना नुसार मंजुर अनुदानाच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना एकुण 4,47,163/- ( चार लक्ष सत्तेचाळीस हजार एकशे त्रेसष्ठ रुपये ) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना वरील रक्कम अदा करण्याकरीता मंजूरीचे आदेश त्वरील काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . देयके मंजूरीनंतर देयकाची रक्कम तसेच संबंधितांना रक्कम अदा केल्याचा दिनांक इ.तपशिल शासनास त्वरील कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरचा उपलब्ध करण्यात आलेला निधी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिनांक 29 मार्च 2024 पुर्वी खर्च करण्याचे निर्देश आहेत , तसेच विहीत मुदत मध्ये निधी हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकारी यांची असणार आहे , तसेच निधी हा विहीत मुदत मध्ये खर्च न झाल्यास सदरचा निधी हा समर्पित करुन त्याबाबतचा योग्य तो खुलासा सादर करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची असणार आहे .
या संदर्भातील जलसंपदा विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.