Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer / farm Labour’s Girl Marriage Anudan Shasan Nirnay ] : शुभमंगल सामुहिक तसेच नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानांमध्ये वाढ करणे संदर्भात राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
शुभमंगल सामुहिक तसेच नोंदणीकृत विवाह या योजना अंतर्गत मुलींच्या विवाहाकरीता आवश्यक असणारे वस्तुंची खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रति जोडपे रुपये 10,000/- अनुदानात वाढ करुन प्रति जोडपे रुपये 25,000/- इतके अनुदान देण्यास त्याचबरोबर सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे देण्यात येणाऱ्या रुपये 2,000/- या अनुदानात वाढ करुन प्रति जोडपे रुपये 2,500/- एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .
सदर योजनेच्या अटी व शर्ती त्याचबरोबर कार्यपद्धती शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 07 मे 2008 , दिनांक 30 सप्टेंबर 2011 व दिनांक 15 फेब्रुवारी 2014 नुसार विहीत केल्याप्रमाणे असणार आहेत . तसेच सदर योजना मधील लाभार्थींना शासनाच्या अन्य विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या सामुहिक विवाह योजना अंतर्गत लाभ मंजूर करता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
दिनांक 30.09.2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर योजना अंतर्गत जिल्हा महिला व बाल अधिकारी कार्यालयामार्फत संबंधित बँकेच्या शाखामध्ये रक्कम जमा करण्याचे तसेच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थी हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
सदर वरील नमुद शासन निर्णयांमधील तरतुदी ह्या दिनांक 01 एप्रिल 2024 पासून लागु होणार आहेत ,या संदर्भात महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 14 मार्च 2014 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..