Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Payment Increase Cabinet Nirnay ] : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध  निर्णय घेण्यात आलेले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगारांमध्ये चक्क 5 हजार ते 8 हजार 500 रुपये पर्यंत वाढ करणेबाबत , कॅबिनेट निर्णय घेण्यात आलेला आहे .

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5 हजार रुपयांची मोठी वाढ : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांच्या कामाच्या व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन याचा विचार करुन सदर आशा स्वयंसेविकांच्या मानधनात चक्क 5,000/- रुपयांची भरीव वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर वाढीव पगार माहे नोव्हेंबर 2023 पासून फरकासह देण्यात येणार आहे . यामुळे राज्य शासनांवर 961.08 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून , सदर वाढीव खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे .

पोलिस पाटलांच्या पगारात मोठी वाढ : आपण पोलिस पाटील हे पद पाहिले असता , बिन पगारी व फुल अधिकारी अशी ख्याती असणारे पद होते , परंतु आता सदर पोलिस पाटलांच्या पगार वाढीसह त्यांच्या कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली असल्याचे सदर पोलिस पाटलांच्या मानधनांमध्ये चक्क 8,500/- रुपये इतकी वाढ करण्यात आल्याने आता पोलिस पाटलांना दरमहा 15,000/- रुपये इतका पगार मिळणार आहे .

या निर्णयामुळे सध्या राज्य शासनांत अस्तित्वात असणारे तब्बल 38,725 पोलिस पाटील पदांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे , याकरीता येणारे वाढीव 394 कोटी 99 लाख रुपये इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे . या निर्णयामुळे पोलिस पाटील यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे . सध्या मिळत असणारे 6,500/- रुपये मानधन पोलिस पाटलांना परवडणारे नसल्याने दरमहा 15,000/- इतके मानधन करण्यात आलेले आहेत .

वैद्यकीय अध्यापकांच्या पगारात वाढ : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वैद्यकीय तसेच दंत व आयुर्वेद महाविद्यालयामधील मानसेवा मध्ये कार्यरत अध्यापकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय दिनांक .13.02.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार प्राध्यापकांना 30,000/- रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000/- रुपये ऐवढे मानधर देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *