Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील शेतकरी / नागरिक / कर्मचारी हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले आहेत . यापैकी शेतकरी व नागरिकांसाठी पुढील महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .
स्वयंरोजगार योजना : राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यात रोजगार , स्वयंरोजगार त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . यांमध्ये पहिल्या योजनांमध्ये राष्ट्रीय अनुसुचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ , नवि दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगार प्रवास वाहन , ट्रॅक्टर , ट्रक , मालवाहु इलेक्ट्रिक रिक्षा त्याचबरोबर कृषी संलग्न व्यवसाय , हॉटेल , ऑटोमाबाईल , धाबा सुरु करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . तर दुसऱ्या योजनांमध्ये आगामी 03 वर्षांमध्ये राज्यात 60 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन त्यामध्ये तब्बल 18 हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे .
वीज सवलत लागु : राज्यातील यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागु करण्याचा निर्णय सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे . यांमध्ये 27 एचपी पेक्षा अधिक पण 201 एचपी पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमागांना प्रति युनिट 75 पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येणार आहे . तर 27 पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपये अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , सदरची सवलत ही सन 2023-28 या कालावधी पर्यंत लागु असणार आहे .
जलसिंचन ग्राहकांना वीज दरामंमध्ये सवलत : उच्चदाब , अतिउच्चदाब तसेच लघुदाब उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये अतिउच्चदाब व उच्चदाब ग्राहकांकरीता 1.16 पैसे प्रति युनिट तर स्थिर आकारांमध्ये प्रति 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत मिळणार आहे . त्याचबरोबर लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहक यांच्या करीता 1 रुपये प्रति युनिट तर स्थिर आकारांमध्ये 15 रुपये प्रति महिना अशी सवलत मिळणार आहे .
पिंपरी चिंचवड मधील शेतकऱ्यांना जमीन परतावा ( 6.25 टक्के दराने ) : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाकरीता भुसंपादित करण्यात आलेल्या जमिनीकरीता संबंधित मालकांना 6.25 टक्के दराने जमीनीचा परतावा देण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे . सदरच्या जमीनी ह्या दिनांक 14 मार्च 1972 ते दिनांक 31 मार्च 1983 या कालावधीमध्ये संपादित करण्यात आल्या होत्या .
अयोध्या येथे राज्य भवनाकरीता भुखंड : उत्तर प्रदेश येथील अयोध्या येथे महाराष्ट्र भवन स्थापन करण्यासाठी 9420.55 चौ.मीटर एवढा भुखंड घेण्याकरीता 67 कोटी 14 लाख रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . या ठिकाणी प्रभू रामाचे दर्शन घेण्याकरीता जाणाऱ्या राज्यातील नागरिकांना माफक दरांमध्ये निवासाची सोय होणार आहे .
गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप : राज्यात गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यास राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये अंत्योदय अन्न योजना , प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभाग मधील सर्व तसेच नागपुर विभाग मधील वर्धा अशा एकुण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषा वरील केशरी शेतकरी शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मध्ये प्रत्येकी 1 किलो या परिमाणात साखर , चणादाळ , रवा व 1 लिटर तेल समावेश असणार आहे .
राज्याच्या तृतीय पंथी धोरण 2024 ला मान्यता : दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तृतीय पंथी धोरण 2024 ला मान्यता देण्यात आलेली आहे .
वनहक्क धारकांना सर्व लाभ देण्यात येणार : वनहक्क धारकांना राज्य शासनांच्या सर्व सरकारी योजना लाभ अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
75 अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यात येणार : राज्यातील अपुर्ण असणारे 75 सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहेत , याकरीता लागणारे 5 हजार कोटी रुपये अपुर्ण सिंचन प्रकल्प करीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आले आहेत .