Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Da Vadh Calculation ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांनाचा डी.ए 4 टक्के माहे जानेवारी 2024 पासून वाढवला आहे , यामुळे सदर वाढीव डी.ए हा माहे मार्च पेड एन एप्रिल वेतनासोबत अदा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखिल पुढील दोन दिवसांमध्ये अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे . कारण राज्य सरकारने पुढील दोन दिवसांमध्ये कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

माहे जानेवारी पासून मिळणार 50 टक्के वाढ : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी महिन्यांपासूनच 4 टक्के महागाई भत्ता वाढविण्यात आल्याने , 4 टक्के डी.ए चा दोन महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे . सदर डी.ए चा फरक माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्यांच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहेत . या वाढीव डी.ए मुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये किती वाढ होईल तर किती रुपयांचा फरक मिळेल ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

डी.ए वाढीमुळे पगारात किती वाढ होईल : महागाई भत्ता वाढीमुळे एकुण पगारात वाढ होतेच याबरोबर एनपीएस मधील योगदानाच्या रक्कमेत देखिल वाढ होते . कर्मचाऱ्यांचे व सरकारचे एनपीएस मधील योगदानाची रक्कम काढण्यासाठी मुळ वेतन + महागाई भत्ताचा विचार केला जातो , यामुळे एकुण पगारांमध्ये वाढ होते . समजा X कर्मचाऱ्याचे मुळे वेतन हे 50,000/- रुपये ऐवढे आहेत तर डी. ए वाढीमुळे पगारातील वाढ काढण्यासाठी  = 50,000  X  4 / 100   = 2000/- रुपये इतकी वाढ होईल .

दोन महिन्यातील डी.ए चा फरक : सदर वरील मुळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांस एका महिन्यातील डी.ए वाढ 2000/- रुपये ऐवढी आहे तर , 02 महिन्यांतील  ( माहे जानेवारी व फेब्रूवारी 2024 ) डी. ए फरक 2,000 X   2   = 4,000/- रुपये एवढा डी.ए फरक माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत मिळेल .  

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *