Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pradhan Mantri Fasal Bima Yojana Shasan Nirnay GR ] : मोदी सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री फसल विमा योजनांस देशातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत , या योजनांमधून शेतकऱ्यांना दिलासादायक आर्थिक लाभ देखिल मिळत आहेत .

मोदी सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनाची सुरुवात ही आठ वर्षापासुन करण्यात आलेली आहे , दरवर्षी या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे . सन 2022-23 या वर्षीपेक्षा सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये सदर योजना अंतर्गत झालेल्यांची संख्या तब्बल 27 टक्यांनी वाढलेली आहे .

सदर विमा फसल योजना अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडून 31,130 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आलेली होती , तर सदर योजना अंतर्गत लाभ शेतकऱ्यांना लाभ म्हणून 1,55,977 कोटी रुपये इतक्या रक्कमेचे अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेले आहेत .

भरणा व लाभ : या विमा योजना अंतर्गत फक्त 100 रुपयांच्या प्रिमियमवर शेतकऱ्यांना 5 पट विमा रक्कम प्राप्त होते , या योजना अंतर्गत प्रतिवर्षी प्रिमियम रक्कम भरुन , वर्षभर आपणांस होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाई अनुदान सदर विमा योजना अंतर्गत प्राप्त होते . दरवर्षी शेतकऱ्यांचा या विमा योजनांकडे कल अधिक वाढला आहे .

सन 2023-24 पर्यंत तब्बल 57 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ : या फसल विमा योजना अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये आत्तापर्यंत 56.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ प्राप्त मिळला आहे , या वर्षांमध्ये या योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल 27 टक्क्यांनी वाढलेली आहे , ही योजना सुरुवात होवून आठ वर्षांपुर्वी झालेली आहे . आत्तापर्यंत या योजना अंतर्गत तब्बल 23.22 कोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झालेली आहे .

या योजनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मोदी सरकारने प्रत्येकी शेतकरी यांना 100 रुपयांच्या प्रिमियम करीता सुमारे 500/- रुपये देण्यात येते . यामुळे ही विमा योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असल्याने , दरवर्षी या योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *