Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन उपदान योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या दिव्यांग कलयाण विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार जि.पालघर येथे दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी कार्यरत असलेल्या आणि दिनांक 12 जुलै 2007 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनांच्या ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रातील एकुण 24 कर्मचाऱ्यांपैकी 01 राजीनामा दिलेला कर्मचारी वगळता इतर 23 कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 नुसार अनुज्ञेय असलेली सेवानिवृत्ती व उपदान योजना , महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतन अंशराशीकरण ) नियम 1984 आणि सर्वसाधारण GPF योजना या नियमातील सर्व तरतुदीसह तसेच त्यांमध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांसह लागु करण्यास सदर निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर लाभ हे दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या संस्था मध्ये दि.01 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त झालेल्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ नियुक्तीच्या दिनांकापासून महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतन अशंराशीकरण ) नियम 1984 लागु करण्यात आले आहेत .

तसेचजिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , विरार येथील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागु केल्यास , कर्मचाऱ्यांकडून सीपीएफ ची जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या व्याजासह अदा करण्यात येणार आहे , त्याचबरोबर केंद्र शासनांकडून भरणा करण्यात आलेली सीपीएफ ची रक्कम व्याजाच्या रक्कमेसह राज्य शासनांच्या खाती जमा करण्याचे निर्देश आहेत .

शासनांकडून देय असलेली सेवानिवृत्ती नि-उपदानाची रक्कम तसेच निवृत्तीवेतनाची रक्कम तीन हप्त्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश आहेत . तसेच सदर लाभ हे जिल्हा पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची रक्कम केंद्र राज्य शासनाने ताब्यात घेण्यात आलेल्या दिनांक 01 एप्रिल 2006 पासून अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात दिव्यांग कल्याण विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *