Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Loan Free Scheme 2019 Shasan Nirnay ] : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना , संदर्भात राज्य शसनांच्या सहकार व पणन विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजना अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णत : परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000/- पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येते .
सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेण्यात आलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 30 जुन 2018 पर्यंत पुर्णत : परतफेड केलेले असल्यास , सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 30 जुन 2019 पर्यंत पुर्णत : परतफेड केलेले असल्यास , सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पुर्णत : परतफेड केलेले असल्यास , अथवा सन 2017-18 , 2018-19 व सन 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार ..
कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेवून यापैकी परतफेडीच्या जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापुर्वी कर्जाची पुर्णत : परतफेड ( मुद्दल + व्याज ) केली असल्यास , अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत : परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50 हजारांपेक्षा कमी असल्यास , अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये वरीलप्रमाणे केलेल्या अशंत : बदलानुसार उक्त योजना अंतर्गत नव्याने पात्र ठरविणाऱ्या कर्ज खात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकांकडून तपासणी करुन व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्जखात्यांना योजना मधील बदलानुसार लाभ देण्यात येणार आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या सहकार व पणन विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..