Spread the love

Live Marathipepar संगिता पवार  प्रतिनिधी [ Government Employee mahagai Bhatta Update ] : सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून विविध योजना व लाभ कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येत आहेत . नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकांच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली , त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला .

निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष महत्व असते , कारण समाजांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महत्वपुर्ण स्थान असते , यामुळे सरकारी नोकरांना खुश केल्यास , निश्चितच मतदानांमध्ये सकारात्मक परिणाम दिसेल , या हेतुने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागणींवर निर्णय घेण्यात येत आहेत . यांमध्ये सुधारित पेन्शन योजना लागु करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे , ज्यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे .

महागाई भत्ता वाढ : महागाई भत्ता मधील वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या आधारे निश्चित करण्यात येत असते , माहे डिसेंबर 2023 चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत , माहे डिसेंबर 2023 मध्ये सीपीआय निर्देशांक हे 0.3 पॉईंटने वाढले आहेत , यामुळे ऑल इंडीया ग्राहक निर्देशांक हे 138.8 पॉइंट झाले आहेत . माहे जानेवारी मधील डी.ए वाढ ही जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील AICPI निर्देशांच्या आधारे निश्चित करण्यात येत असते .

डी.ए मध्ये 05 टक्क्यापर्यंत होणार वाढ : सदर माहे जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन डी.ए मध्ये 5 टक्के पर्यंतच डी.ए वाढ करण्यात येणार आहे .

डी.ए वाढीवर अधिकृत्त निर्णय कधी होणार : मिळालेल्या मिडीया रिपोर्टनुसार , दिनांक 13 मार्च पासुन आचारसंहिता लागु होणार असल्याने , त्या अगोदरच कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरीता डी.ए मध्ये वाढ करणेबाबत अधिकृत्त निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . म्हणजेच माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्यासोबत वाढीव डी.ए लाभ मिळेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *