Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Medical Bill Related Shasan Nirnay ] : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांकडून दिनांक 01 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम 1961 व त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय यामधील तरतुदींच्या अधिन राहून वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती मंजूर करण्यात येत असते . सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 06.06.2019 रोजीच्या सं.क्र 03 येथील निर्णय , दिनांक 07.04.2021 नुसार सदर विभागाच्या अधिनस्थ पुरवठा यंत्रणा मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीकरीता विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख घोषित करण्यात आले आहेत .
सदरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय यामधील तरतुदीच्या अधीन राहून व सार्वजनिक आरोग्य विभाग , शासन निर्णय दिनांक 17 जानेवारी 2023 नुसार सदर अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त पुरवठा यंत्रणा मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारण करण्यात येत आहेत .
सदर शासन निर्णय हा प्रलंबित प्रकरणांना देखिल लागू असणार आहेत . तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 17.01.2023 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असणार आहेत . या संदर्भात अन्न व नागरी , पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांकडून दिनांक 01.03.2024 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.