Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत एनपीएस धारकांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शनचे लाभ लागु करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून आज दिनांक 01 मार्च 2024 रोजी मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेमध्ये 18 वर्षांच्या सेवेनंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत पुढीलप्रमाणे लाभ प्राप्त होणार आहेत . यांमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मध्ये निवृत्ती वेतन घ्यायचे आहे अथवा राज्य शासन मार्फत सुरु होणाऱ्या सुधारित निवृत्ती वेतन योजनांमध्ये सहभागी घ्यावयाचे आहेत याबाबत विकल्प द्यावा लागणार आहे . तसेच राज्यच्या सुधारित निवृत्ती योजनानुसार कर्मचाऱ्यांची 20 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के निवृत्ती वेतन तत्कालीन महागाई भत्यासह अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .
तसेच 20 वर्षापेक्षा कमी सेवा होवून सेवानिवृत्ती होत असल्यास अशा वेळी त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन तत्कालीन डी.ए सह दिले जाणार आहेत . तसेच सेवेत असतानाच निधन पावल्यास अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस कुटुंब निवृत्ती वेतन डी.ए सह मंजूर करण्यात येईल .
तसेच सेवा निवृत्तीच्या नंतर निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्युनंतर त्याला अंतर्गत स्वतंत्र निवृत्ती वेतन निधी व्यवस्थान कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे . तसेच या योजना करीता संचालक , लेखा व कोषागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल .
तसेच राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाहीत , फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय असणार आहेत . सदर सुधारित पेन्शन प्रणाली ही राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला असणार आहे . तसेच ज्यानां पेन्शन नको असेल अशा कम्रचाऱ्यांना एकरकमी देण्याचाही पर्याय यांमध्ये सरकारने खुला ठेवला आहे .
तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान , अर्जित रजेचे रोखीकरण , तसेच गट विमा योजनेचे रक्कम देखिल अनुज्ञेय करण्यात येणार आहेत . या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले सविस्तर निर्णय प्रसिद्धी पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
जूनी पेन्शन निर्णय (प्रसिध्दीपत्रक)