Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kharip Hangam Farmer Anudan Shasan Nirnay ] : खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देणेकरीता निधींचे वितरीत करण्यातस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .

अतिवृष्टी , चक्रिवादळ , पुर , या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामांमध्ये उपयोगी पडावे या करीता राज्यातील शेतकऱ्यांना एका हंगामांमध्ये एक वेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत देण्यात येत असते . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शतीपिकांच्या नुकसान करीता सदर निर्णयातील संदर्भाधिन पत्रांनुसार राज्य शासनांकडून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान जाहीर करण्यात आलेले आहेत .

सदरच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2023 साठी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्य राज्यातील 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीकरीता निविष्ठा अनुदान वाटप करण्यासाठी राज्य शासनांच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 27.03.2023 रोजीच्या निर्णयानुसार , निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून त्याचबरोबर राज्य  शासनांच्या निधीमधून एकण 244322.71 लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहेत .

याकरीता एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दाराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करण्यात येणार आहेत . तसेच सन 2023 च्या पावसाळी हंगामामध्ये यापुर्वी अतिवृष्टी , पुर यामुळे झालेल्या ज्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता मदत दिली आहे , त्याच क्षेत्रातील त्याच शेतीपिकांच्या नुकसानीकरीता सदर शासन निर्णयानुसार पुन्हा मदत अनुज्ञेय असणार नाही . यामुळे द्विरुक्ती होणार नाही  याची खात्री करण्यात येणार आहेत .

तसेच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्याच्या नंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशिल हा जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर निधी हा प्रधान लेखाशीर्ष 2245 – नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय , 01 अवर्षण इ. अंतर्गत सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . जिल्हा व तालुक्यानिहाय निाधींची वितरण पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करु शकता ..

शासन निर्णय (GR)

शेतीविषयक योजना , कृषी अपडेट विषयक अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून WhatsApp ग्रूप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *